माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओसरगांव येथे विमा क्षेत्रातील करीयर विषयावर व्याख्यान

⚡कणकवली ता.२०-: माता वैष्णोदेवी महाविद्यालय ओसरगाव येथे बी.कॉम. बँकींग इन्शोरन्सच्या विद्यार्थ्यांकरीता विमा क्षेत्रातील करीयरच्या संधी आणि व्यक्तीमत्व विकास या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.

भारतीय आर्युविमा महामंडळाच्या सिधुदूर्गनगरी शाखेचे विकास अधिकारी संग्राम टिपूकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी भविष्यातील करीयरच्या संधी कशा प्रकारे शोधाव्यात, त्याची निवड कशी करावी तसेच स्व:ताचा आत्मविश्वास वाढवून आपल्या व्यक्तीमत्वामध्ये कशा प्रकारे चांगले बदल करावेत याबाबतीत मार्गदर्शन केले.
विमा क्षेत्राबाबतीत मार्गदर्शन करतांना विविध विमा कंपन्यांची संघटन रचना कश्याप्रकारे असते. विमा क्षेत्राचा विस्तार कशा प्रकारे झाला याबाबतीतही माहीती दिली. आजच्या काळात विविध प्रकारच्या विम्यांचे महत्व सांगीतले. तसेच भारतात विमा क्षेत्राची व्याप्ती कशी आहे. विविध विमा क्लेम कसे होतात आणि या सर्व बाबतीत आयआरडीए कशा प्रकारे नियंत्रण ठेवते याबाबतीत सविस्तर माहीती दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्तावीक व पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.समीर तारी यांनी करुन दिली तर आभार प्रा. त्रिवेणी भट यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाचे प्रकल्प अधीकारी श्री. संतोष सावंत, सर्व प्राध्यापक वर्ग आणि संबंधीत विभागाचे विद्यार्थी उपस्थीत होते.

You cannot copy content of this page