⚡देवगड ता.२०-: जिल्हा परिषद अभियंता संघटना सिंधुदुर्गच्या सन 2022-2025 पर्यंतच्या कालावधीकरीता जिल्हाध्यक्षपदी जि.प.बांधकाम उपविभाग देवगडचे शाखा अभियंता अनिल भास्कर तांबे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या ओरोस येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. सदरची सभा मावळते जिल्हाध्यक्ष अभियंता शेखर आदण्णवार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. संघटनेची उर्वरीत कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष- इंजि.अमित कल्याणकर(दोडामार्ग ),
सचिव इंजि.प्रफुल्लकुमार शिंदे (वैगुर्ले), सहसचिव – इंजि.गणेश म्हाडेश्वर(कुडाळ) ,कोषाध्यक्ष- इंजि.हेमंत पाडागावकर(ओरोस) ,इंजि.लक्ष्मण परुळेकर(ओरोस), सदस्य ,इंजि.सुहास टेमकर,सावंतवाडी-सदस्य ,इंजि.गणेश कडूलकर,कणकवली-सदस्य ,
इंजि.प्रकाश कात्रे-मालवण,इंजि.सतीश रावराणे वैभववाडी, इंजि.वर्षाराणी जाधव-महिला प्रतिनिधी. तालुका अध्यक्ष खालीलप्रमाणे- इंजि.सुहास सावंत-वैभववाडी,इंजि.मिलिंद अतवाड-देवगड, इंजि.अक्षय मगर,मालवण,इंजि.प्रमोद जोईल,कणकवली, इंजि.मंगेश हवालदार(कुडाळ,) इंजि.प्रितम पवार,वेंगुर्ले. इंजि.भिवा आयनोडकर(दोडामार्ग), इंजि.सुदेश राणे(सावंतवाडी ),
मुख्यालय प्रतिनिधी – इंजि.मुकुंद पाचपिंपळे. यावेळी मागील कार्यकारिणी सदस्यांचा त्यांनी संघटनेसाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार करण्यात आला.नूतन अध्यक्ष इंजिनिअर अनिल तांबे यांनी याप्रसंगी बोलताना संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी एकजूट दाखवावी असे आवाहन केले. तसेच सदस्यांना कार्यालयीन व प्रशासकीय कामकाजात येणार्या अडचणी सर्वांना सोबत घेऊन सोडविण्यात येतील असे सांगितले.संघटनेचे नूतन सचिव इंजि.प्रफुल्लकुमार शिंदे यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे आभार मानले.
शाखा अभियंता अनिल तांबे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
