मंत्री रवींद्र चव्हाण खऱ्या अर्थाने राज्याचे विकासपुरुष…

गोव्याचे आमदार जीत आरोलकर यांचे उद्गार; दीर्घायुष्य लाभण्यासाठी स्वामी चरणी घातले गाऱ्हाणे…

बांदा/प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे खऱ्या अर्थाने राज्याचे विकासपुरुष आहेत. त्यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात विकासाची गंगा निर्माण केली आहे. त्यांच्या विकासकामांचा धडाका यापुढेही कायम राहून महाराष्ट्र राज्य हे विकासाच्या प्रगतीवर राहू दे असे साकडे मांद्रेचे (गोवा) आमदार तथा गोवा गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष जीत आरोलकर यांनी घारपी मठ येथील श्री स्वामी चरणी घातले. यावेळी मंत्री चव्हाण यांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले.
आमदार जीत आरोलकर यांनी आज सायंकाळी बांदा सरपंच अक्रम खान, युवा सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम, निलेश देसाई यांच्यासह घारपी येथील जागृत श्री स्वामी समर्थ मठाला भेट देऊन श्री स्वामींचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त साकडे घालण्यात आले. यावेळी घारपी मठाचे प्रमुख विजय गावकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार आरोलकर म्हणाले कि, मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्यात काम करण्याची कार्यशैली ही विकासात्मक आहे. राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळतानाच सर्वसामान्यांच्या प्रश्नांनाही न्याय देण्याचे काम ते तत्परतेने करतात. त्यांच्या विकासकामांचा धडाका पाहता ते राज्याचे खऱ्या अर्थाने विकासपुरुष आहेत. त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो यासाठीच आपण श्री स्वामी चरणी प्रार्थना करण्यासाठी याठिकाणी आल्याचे त्यांनी सांगितले.

You cannot copy content of this page