डीपी प्लॅन कमिटीत विरोधी गटनेत्याला देणार स्थान

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले स्पष्ट

⚡कणकवली ता.२०-: कणकवली शहराच्या प्रस्तावित विकास आराखडयाबाबत आज नगरपंचायत सभागृहात झालेल्या बैठकीत चक्क नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी डीपी प्लॅन कमिटीत विरोधी गटनेता सुशांत नाईक अथवा नगरसेवक कन्हैया पारकर यांना देखील स्थान दिले जाईल असे सांगितले.
कणकवली शहर विकास आराखड्याबाबत सहाय्यक नगरचनाकार देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपंचायत सभागृहात बैठक झाली. डीपी प्लॅन कमिटीमध्ये नियमानुसार स्टँडिंग कमिटी चे सत्ताधारी 3 सदस्य असतात. मात्र नियमांच्या पलीकडे जात शहर विकासाचा आराखडा असल्यामुळे नगरपंचायतमध्ये सत्तेत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अबिद नाईक आणि विरोधी नगरसेवकही या कमिटीत असावे यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विरोधी नगरसेवकांना आपला प्रतिनिधी देण्याबाबत सूचना केली. या बैठकीला मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सत्ताधारी गटनेता तथा आरोग्य सभापती संजय कामतेकर, बांधकाम सभापती ॲड. विराज भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अबिद नाईक नगरसेवक अभि मुसळे, विरोधी गटनेता सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, मेघा गांगण, उर्वी जाधव,कविता राणे, मानसी मुंज, माही परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page