ओसरगावचे माजी उपसरपंच बबली राणे यांनी घडविले माणुसकीचे दर्शन

⚡कणकवली ता.२०-: मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव पटेलवाडी येथे नग्न अवस्थेत एक चालत जाणाऱ्या वेडसर तामिळनाडू येथील पादचाऱ्याला ओसरगावचे माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे
यांनी मदतीचा हात पुढे करीत माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

ओसरगाव पटेलवाडी येथे रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्यांकडे हा इसम भूक भागविण्यासाठी पैशाची मागणी करत होता. त्याच दरम्यान ओसरगावचे माजी उपसरपंच , सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांनी त्या इसमाला पूर्ण कपडे घालायला लावले व त्याला पिक अप शेडमध्ये त्याला वडापाव, पाणी व चहाची व्यवस्था चंद्रहास उर्फ बबली राणे यांनी केली. दरम्यान यावेळी बघ्याची संख्या वाढली होती. काहीजण व्हिडिओ शूटिंग करत होते तर काहीजण फोटो काढत होते पण कोणीही त्याला चहा पाण्याची व्यवस्था करायला तयार नव्हते मात्र ताबडतोब बबली राणे यांनी हा सगळा प्रकार थांबवला व परत एकदा माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले.

You cannot copy content of this page