राष्ट्रवादी नगरसेवक अबीद नाईक यांनी वेधले लक्ष
⚡कणकवली ता.२०-: कणकवली नगरपंचायत विकास आराखडा हा शहरातील नागरिकांना अधिकृत घर बांधता यावे असा बनवावा असे मत कणकवली नगर नगरपंचायत आयोजित नगरसेवकांच्या बैठकीत राष्ट्रवादी नगरसेवक अबीद नाईक सांगितले.
कणकवली शहर विकास आराखडा तयार करताना थोडा उशीर झाला तरी हरकत नाही पण लोकांची घर बांधण्या साठी अधिकृत पंचायतला परवानगी देता यावी यासाठी शहरात ग्रीन झोन, येलो झोन व विविध आरक्षणे गरज नसतील तर उठवावीत व नवीन अन्य आरक्षणे लागू नयेत असे सांगत कणकवली शहरातील लोकसंख्या टप्प्याटप्प्याने वाढत आहे. त्यामुळे लोकांच्या ज्या काय अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधा आहेत. त्या सुविधेमधील एक घर बांधणी आहे. ज्यावेळी घर बांधायचा प्रसंग येतो त्यावेळी नगरपंचायत या क्षेत्रातला पिवळा पट्टा असेल तिथेच जनता घर बांधू शकते परंतु वीस वर्षांपूर्वी जो काय आराखडा लोकांच्या माथी मारला गेला कोणाला विश्वासात न घेता त्याचा हा परिणाम झालेला आहे .आणि आज वीस वर्षानंतर पुन्हा एकदा आराखडा बनवायचा सरकारने आदेश केलेला आहे. त्याला अनुसरून कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी चांगली भूमिका घेतली आहे. विरोधी पक्ष कणकवली नागरी व सगळ्यांना सर्वसामावेशक असा हा आराखडा झाला पाहिजे ही भूमिका नगराध्यक्षांनी मांडली. त्याचे आम्ही अभिनंदन करतो .त्याचबरोबर आपली शहरात ग्रीन झोन आहे त्या ग्रीन झोन मध्ये लोकांना घर बांधता येत नाहीत लोकांना घर बांधण्यासाठी गेल्यानंतर तिथे कुठलेही कर्ज सुविधा मिळत नाही पण त्या लोकांनी पण अधिकृत अशी घर बांधून ठेवली आहेत आणि त्याची सुविधा पूर्णपणे नगरपंचायत स्तरावर आम्ही देत असतो. याच लोकांना आपण हक्काचं परमिटेबल घर बांधायला मिळालं तर त्यांना बँक लोन देखील उपलब्ध होते.त्यामुळे आजच्या मीटिंगमध्ये मी आज नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकारी या पूर्ण बॉडीच्या समोर माझी भूमिका मांडलेली आहे की येणाऱ्या आराखडा चार महिने लेट झाला तरी चालेल परंतु येणारे वीस वर्षाच्या पिढीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही व लोकांना आपला हक्काचं अधिकृत घर मिळावं ची भूमिका राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक यांनी बैठकीत मांडली.
