Global Maharashtra Breaking News

मालवण तालुका काँग्रेसची उद्या तातडीची बैठक

⚡मालवण ता.०२-: मालवण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची तातडीची बैठक बुधवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता मालवण फोवकांडा पिंपळ येथे पदाधिकारी अरविंद मोंडकर यांच्या निवासस्थानी आयोजित केली आहे. या बैठकीस जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष इर्शाद शेख उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत भविष्यात होणाऱ्या जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणूक यासह पक्षसंघटना बळकटी साठी प्रयत्न करण्यासाठी…

Read More

देवगड येथील कंत्राटी कामगार रघुवीर पांचाळ याला अशोक सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र…

मालवण ता.०२-:जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरणच्या ८५ टक्केच्या परिपत्रकामुळे कमी केले होते. यात कमी केलेल्या काही कामगारांना काही दिवसांपूर्वी तर आज देवगड येथील रघुवीर पांचाळ या कामगाराला सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी कंत्राटी कामगार धोंडू पवार, रुपेश जाधव, हरेश लांबोरे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग वीज…

Read More

नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

बांदा/प्रतिनिधीयेथील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू असलेल्या नट वाचनालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.. यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस आर सावंत, कार्यवाह राकेश केसरकर, संचालक शंकर नार्वेकर, निलेश मोरजकर, संचालिका स्वप्नीता सावंत, अनंत भाटे, प्रकाश पाणदरे, अंकुश माजगावकर, ग्रंथपाल सुस्मिता नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब, सचिन चांदेकर यांच्यासह वाचक उपस्थित…

Read More

शहिद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या 4 थ्या स्मृतिदिनानिमित्त 6 ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन…

आरसीसीआय आणि कौस्तुभ रावराणे मित्रमंडळाच्या वतीने आयोजन वैभववाडी संजय शेळकेशहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त आरसीसीआय आणि कौस्तुभ रावराणे मित्रमंडळांच्या सयुक्त विद्यमाने ६ ऑगस्टला निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा चार गटात घेतली जाणार असुन या स्पर्धेत तालुक्यातील विद्यार्थ्यानी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. शहीद मेजर रावराणेच्या स्मृती…

Read More

सांगवे कनेडी बाजारपेठेतील
स्नेहलता कुलकर्णी यांचे निधन

⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी बाजारपेठेतील श्रीमती स्नेहलता मधुकर कुलकर्णी (वय ७८) यांचे २ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे , एक मुलगी, सुना , जावय, नातवंडे , दोन भाऊ असा परिवार आहे.ओंकार मेडिकल स्टोअरचे मालक राजेश कुलकर्णी व आपले सरकार महाईसेवा केंद्रचे मालक मंगेश कुलकर्णी यांच्या त्या आई…

Read More

कणकवली तालुक्यातील सर्पमित्रांचा
ओसरगाव तलावाच्या काठावर सत्कार

⚡कणकवली ता.०२-:नागपंचमी सणाचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील सर्पमित्रांचा ओसरगाव तलावाच्या काठावर गावाच्यावतीने सत्कार कणकवलीचे तहसीलदार श्री आर. जे. पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे,सुनील साटम , वाय.जी .राणे, हेमंत आंगणे ,पोलीस पाटील सौ .संजना आंगणे ,हेमंत तांबे, सुदर्शन नाईक, सौ. चंदना राणे, चिनार राणे उपस्थित होते तसेच…

Read More

माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे यांना पितृशोक

⚡वैभववाडी ता.०२ संजय शेळके-: वाभवे गावचे सेवानिवृत्त मुख्याद्यापक तथा सुप्रसिध्द भजनकार बाळकृष्ण आकाराम रावराणे ( वय ८०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. गावातील स्मशानभुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More

कोकणातील आमदारांनी महामार्ग पुर्ततेसाठी संघटित प्रयत्न करावेत: मोहन केळुसकर

⚡कणकवली ता.०२-: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे आशियातील सर्वांत मोठे परिवहन महामंडळ म्हणून गणले जाते. मात्र कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे आणि माजी परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या कारभारामुळे हे महामंडळ आर्थिक गोत्यात सापडले आहे. आता तर प्रवासी संख्येत ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याने महामंडळाचा डोलारा सांभाळणे कठीण…

Read More

विजय पराजयाचा विचार न करता शालेय स्तरापासून स्पर्धा परीक्षांत सहभागी व्हा

आचरा न्यू इंग्लिश स्कूल येथे नीलिमा सावंत यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.०२-: विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर घेतल्या जाणारया स्पर्धा मधून सहभागी होत विजय पराजयाचा विचार न करता आपला आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करावा.सध्याच्या स्पर्धात्मक युगात प्रगती साठी आत्मविश्वास महत्वाचा असल्याचे मत स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांनी आचरा येथे केले. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा तर्फे…

Read More

मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांचा महसूल दिनी सत्कार

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केला सन्मान ⚡मालवण ता.०२-: मसुरे मंडळ अधिकारी सुहास चव्हाण यांचा सोमवारी महसूल दिनी ओरस येथे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुहास चव्हाण यांना मानपत्र, गौरव चिन्ह, गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले. शासन स्तरावरील अनेक योजना तळागाळापर्यंत राबविणे, सर्वसामान्य जनतेपर्यंत त्या पोहचवणे. आपत्ती काळात सेवा बजावणे. निवडणूक…

Read More
You cannot copy content of this page