Headlines

ग्रामीण रुग्णालय अतिक्रमण हटाव प्रकरणी पाच संशयितांसह ७ ते ८ जणांवर गुन्हा…

⚡कुडाळ ता.०६-: ग्रामीण रुग्णालय कुडाळच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असताना शासकीय कर्मचाऱ्यांना धमकावून कामात अडथळा आणल्याप्रकरणी अभय तुकाराम शिरसाट, विनय शिरसाट, तरबेज शेख, राजश्री नेवगी, अमित राणे या पाच संशयितांसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नगरपंचायत कुडाळ येथील मुकादम विलास मायाजी मुणगेकर (वय ५६, रा. मुणगे बौद्धवाडी, ता. देवगड; सध्या रा. ग्रामपंचायत वसाहत, पान बाजार, कुडाळ) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुणगेकर तसेच ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी हे रुग्णालयाच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमण हटविण्याचे शासकीय काम करीत होते. यावेळी वरील संशयितांसह सात ते आठ अनोळखी व्यक्तींनी बेकायदेशीर जमाव केला.
या जमावातील व्यक्तींनी तक्रारदार यांच्या अंगावर धावून जात त्यांना धमकावले तसेच शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखत अतिक्रमण हटाव कारवाईचे काम बंद पाडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मुकादम विलास मुणगेकर यांच्या फिर्यादीवरून कुडाळ पोलिसांनी संबंधित संशयितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page