कणकवली : गोपुरी आश्रमातील चिकूच्या बागेत व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या व्यासपीठाला पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांचे नाव देण्यात आले. हा नामांतर सोहळा आज सकाळी गोपुरी आश्रमाचे पदाधिकारी आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला.

दरम्यान ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, लक्ष्मीकांत भावे, अजित सावंत यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, खजिनदार विनायक सापळे, संचालक संदीप सावंत, नितीन तळेकर, सदाशिव राणे, उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, पत्रकार वीरेंद्र चिंदरकर, महेश सरनाईक, सुधीर राणे, स्वप्नील वरवडेकर, तुषार हजारे, विराज गोसावी, मयुर ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी गोपुरी आश्रमच्या पदाधिकारी व्यासपीठाला माधवराव गाडगीळ यांचे नाव देण्यामागील उद्देश सांगितला.
