सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ओम गणेश निवासस्थानी घेणार जनतेच्या भेटीगाठी..

⚡कणकवली ता.२९-: मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे शुक्रवारी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ओम गणेश निवासस्थानी जनतेच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यानंतर पुढील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
