Headlines

विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया साधनांचा मर्यादित वापर करून शिक्षणाला अधिक प्राधान्य द्यावे….

नयोमी साटम ; आडेली हायस्कुल येथे 21 गरजू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप

वेंगुर्ला
कोकणातील मुलांमध्ये विशेष टॅलेंट आहे. विद्यार्थ्यांनी आज व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांचा मर्यादित वापर शिक्षणाला अधिक प्राधान्य द्यावे. आपल्यातील गुणवत्तेनुसार प्रामाणिकपणे अभ्यास करून व आई वडिलांचा आदर्श घेऊन करियर घडवा, असे प्रतिपादन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कुल आडेली (ता. वेंगुर्ला )येथे बोलताना केले.
वेंगुर्ला तालुक्यातील शिक्षण प्रसारक समिती, वेतोरे संचलित
कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूल आडेली या विद्यालयातील गरजू व होतकरू अशा २१ विद्यार्थ्यांना अरविंद विजया रमाकांत प्रभू मित्रमंडळ, मुंबई, डॉ. सचिन घोसाळकर, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या सौजन्याने प्राप्त झालेल्या २१ सायकलचे वितरण अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक
नयोमी साटम, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते, सिंधुदुर्ग
अरविंद प्रभू, ज्येष्ठ पत्रकार – संपादक शेखर सामंत आदी प्रमुख मान्यवरांच्या व संस्थाचालकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन नयोमी साटम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमात अरविंद प्रभू यांनी मार्गदर्शन केले. प्रशालेसाठी पालकांनी 100 विद्यार्थी उपलब्धता केल्यास मुख्य इमारत वरील हॉल बांधून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. शेखर सामंत यांनी बोलताना, विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने प्रामाणिक राहणे आवश्यक आहे. व्यसनांच्या आहारी न जाता निवडलेल्या व्यवसायात प्रामाणिकपणे कार्यरत राहून आपल्या गुरुजनांचे नाव उज्वल करावे, असे मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण प्रसारक समिती वेतोरे चे कार्याध्यक्ष दिगंबर नाईक, संस्था संचालक चंद्रकांत गडेकर, श्री. गोगटे, उपकार्याध्यक्ष सूर्याजी नाईक, आडेली जि. प. सदस्य विजय नाईक, पं. स. सदस्य नितीन मांजरेकर, आडेली ग्रा. पं. सरपंच यशश्री कोंडसकर, उपसरपंच परेश हळणकर, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष राजेश सामंत, विकास शेणई, संस्था संचालक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश धुरी, कोषाध्यक्ष अरुण धर्णे, मुख्याध्यापक सुनील जाधव, बंड्या धर्णे, वामन भोसले, वसंत पेडणेकर, वेतोरे हायस्कूल मुख्याध्यापक टी. डी. खरबडे, प्रभाकर नाईक, स्वाती वालावलकर, डी. डी. चव्हाण, एस. आर. पोवार, विठ्ठल आरोलकर, सौ. आरोलकर, बाबा टेमकर, अविनाश तोरसकर , श्री. माळी, गावडे, उदय आडेलकर, बाबा धर्णे, पोलीसपाटील संजना होडावडेकर, राकेश धर्णे विनायक धर्णे, सुरेश धर्णे, शिवसेना पदाधिकारी अरविंद करलकर, स्वाती पालव, रवी मेस्त्री, विष्णू कोंडसकर, पूजा अवसरे,
तसेच ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी, माजी विद्यार्थी, उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या वतीने मान्यवरांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात नयॊमी साटम यांचा स्वाती वालावलकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माळी व गावडे यांनी आभार मानले. हायस्कूल, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांच्या वतीने कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यात आले.

You cannot copy content of this page