⚡कणकवली ता.०६-:
गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी शिनू मयांडी देवर (५४, रा. फोंडा) याला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्यावतीने येथील अॅड. अग्निवेश तावडे व अॅड. आर्यन तावडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.
वैभववाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांमधील कलमांतर्गत गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील एका आरोपीने गुटखा शिनू मयांडी देवर याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार शिनू देवर याला आरोपी करून अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयीन कोठडीनंतर जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. यावेळी अॅड. अग्निवेश तावडे व अॅड. आर्यन तावडे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जामीन मंजूर केला.
