Headlines

सुनेत्राताई पवार यांचे गोव्यात अरशद बेग यांनी केले स्वागत..

सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक स्थितीवर चर्चा; युवा कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यावर भर..

⚡सिंधुदुर्ग दि.०६-: महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे गोवा येथील डिचोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अरशद बेग यांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षाची सद्य राजकीय व संघटनात्मक स्थिती तसेच आगामी काळातील पक्षाच्या वाटचालीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासह युवा कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामात सक्रिय करण्याबाबत विचारविनिमय झाला. आगामी काळात जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी तळागाळापर्यंत संघटन पोहोचविण्याच्या दृष्टीने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्य राजकीय परिस्थिती, पक्षाची आगामी रणनीती आणि युवा नेतृत्वाची भूमिका यावरही यावेळी चर्चा झाली. पक्षाच्या विचारधारेनुसार संघटन मजबूत करण्यासाठी युवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा पदाधिकारी व सहकारी तौसिफ आगा, मन्सूर ख्वाजा, शहबाज आगा यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनेत्राताई पवार यांच्या भेटीमुळे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

You cannot copy content of this page