चिंदर येथे ग्रामपंचायत आयोजित कथाकथन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.१०-: मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. त्यांच्या वक्तृत्व गुणांचा विकास व्हावा. एक संस्कारक्षम पिढी निर्माण होऊन त्यांना व्यासपीठ मिळून त्यांचा आत्मविश्वास वृध्दिगत व्हावे या प्रामाणिक उद्देशाने चिंदर ग्रामपंचायत आयोजित व चिंदर गावच्या सर्व शिक्षक वृंदाच्या सहकार्याने चिंदर शाळा नंबर एक येथे कथाकथन स्पर्धा संपन्न झाली.
पाच गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिली-दुसरी या पहिल्या गटात रेणू शेतसंदी प्रथम, गार्गी मुणगेकर व्दितीय, सार्थक सोलापूरे तृतीय, इयत्ता तिसरी या दुसऱ्या गटात- श्रेयस चौधरी प्रथम, विभावरी चौहान व्दितीय, केदार कदम तृतीय, इयत्ता चौथी या तिसऱ्या गटात समर्थ सोलापूरे प्रथम, समर्थ घुमडे व्दितीय, श्रावणी सुर्वे तृतीय, इयत्ता पाचवी सहावी या चौथ्या गटात किंजल परब प्रथम, फ्रँकलिन फर्नांडीस व्दितीय, व आर्यन अपराज तृतीय तसेच शेवटच्या सातवी आठवी या पाचव्या गटात भक्ती अपराज प्रथम, भाग्येश प्रचंडे व्दितीय, समीरा घाडी तृतीय यांनी पहिले तिन क्रमांक मिळविले.
सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वै, हडी सरपंच महेश मांजरेकर, भाजप तालुकाध्यक्ष-धोंडी चिंदरकर, महेंद्र मांजरेकर, केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर व आचरा पिठ विस्तार अधिकारी उदय दिक्षित यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी
. हडी सरपंच महेश मांजरेकर, सरपंच सौ. राजश्री कोदे, माजी सरपंच धोंडी चिंदरकर, महेंद्र मांजरेकर यांनी मुलांना यावेळी मार्गदर्शन केले.
किरण चेडगे, नवनाथ भोळे, माधुरी पाटील, नंदकुमार जुंदळे, गंगाराम पोटघन, शुभांगी मेश्राम, प्रविण तेली, पंढरीनाथ करवडकर, शत्रुघ्न बुटे, योगिता उपरकर, शिवानंद सोलापूरे, राजेंद्र चौधरी, रणजित देवकर, दयानंद प्रचंडे, निशिगंधा वझे, भिमाशंकर शेतसंधी, संभाजी पवार, राजन जोशी, राजेंद्र गाड, काळे, तसेच पोलिस पाटील दिनेश पाताडे, ग्रामपंचायत सदस्य- दुर्वा पडवळ, स्वरा पालकर, जान्हवी घाडी, रिया घागरे शशिकांत नाटेकर, हिमाली अमरे, प्रिया पालकर, मनवा चिंदरकर, तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपसरपंच दिपक सुर्वे यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेत प्रास्तविक केंद्र प्रमुख प्रसाद चिंदरकर यांनी सुत्रसंचालन यशवंत पाटील यांनी तर आभार नवनाथ भोळे यांनी मानले.

फोटो
चिंदर येथे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेला विद्यार्थी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी वर्ग छायाचित्रात दिसत आहे

You cannot copy content of this page