मालवणात इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळ आणि महापुरुष रेवतळे मित्रमंडळ यांच्यावतीने इकोफ्रेंडली नरकासुर स्पर्धेचे आयोजन दि. २३ ऑक्टोबर रोजी रात्री ९ ते १२ यावेळेत वायरी रोड, भरड मालवण येथे करण्यात आले आहे. यामध्ये नरकासुर बनविताना प्लास्टिक व थर्माकोलचा वापर करू नये.

या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक -८,८८८ रु. व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक – ४४४४ रु. व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक – २२२२ रु. व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. बक्षीस वितरण मालवण बंदर जेटी येथे करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पंकज गावडे ७९७२८६११२४ व शुभम लुडबे ९७६४१४८७८२ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page