विकास संस्था सक्षम करण्यात जिल्हा बँक महत्वाची भूमिका बजावेल

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन

देवगड (प्रतिनिधी)
विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा वापर जिल्हा बँकनिवडणुकीपूरता न ठेवता त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन विकास संस्थांची पायरी सक्षम करणे महत्वाचे आहे.विविध कार्यकारी सहकारी संस्था ही सहकारातील एकमेव नोंदणीकृत सर्व प्रकारचे व्यवसाय करण्याची संधी असलेली संस्था आहे.कर्ज वाटप केले की या संस्थेचे काम संपले असे नगरपंचायतसून ती संस्था अनिष्ट तफावतीत जाणार नाही याची काळजी घेणे हेही तितकेच महत्वाचे आहे.जिल्ह्यातील ५ वि वि का से,संस्था ५ कोटी पेक्षा अधिक व्यवसाय करणाऱ्या संस्था असून यातील एक संस्था देवगड तालुक्यातील आहे .

या बरोबरच ०% वसुली करणारी संस्थाही देवगड तालुक्यात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २१ विकास संस्था अनिष्ठ तफावतीत आहेत त्या पैकी १३ विकास संस्था या देवगड तालुक्यातील आहेत त्यावर चर्चा होणे महत्वाचे आहे .विकास संस्था या विकासाची महत्वाची पायरी असून त्यामुळे विकास संस्था सक्षम करण्याची महत्वाची भूमिका या जिल्हा बँक बजावेल. त्यासाठी संचालक मंडळाचे सहकार्य महत्वाचे आहे .या साठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून देवगड तालुक्यातील एकही विकास संस्था यापुढे अनिष्ठ तफावतीत रहाणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले जातील त्याकरिता विविध व्यवसायाद्वारे जिल्हा बँकेशी सवांद साधने महत्वाचे आहे.असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी जामसंडे येथे चर्चा सत्रात बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने प्राथमिक विकास संस्था सक्षमीकरण चर्चासत्राचे आयोजन सांस्कृतिक भवन जामसंडे येथे करण्यात आले होते.या वेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा बॅकेचे संचालक प्रकाश बोडस ,श्रीम.प्रज्ञा ढवण, समिर सावंत , प्रकाश राणे,आरिफ बगदादी ,संदिप साटम जिल्हा बॅकेचे कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, क्षेत्रवसुली सरव्यवस्थापक देवानंद लोकेगांवकर कर्ज विभाग प्रमुख . के बी वरक,तालुका विकास अधिकारी संजय घाडी, देवगड शाखा व्यवस्थापक अवधूत गोडवे,विकास संस्थांचे चेअरमन,मनोहर मोदी,सचिव सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ३० जून अखेर पर्यंत वसुलपात्र बॅक कर्जा ची १००टक्के वसुली केल्याबद्दल पडेल विकास संस्था, किंजवडे विकास संस्था, महाळुगे, नाद,ओंबळ, शेवरे विकास संस्था, नाडण विकास संस्था, कुणकेश्वर विकास संस्था, वेळगिवे विकास संस्था,श्री भगवती विकास संस्था मुणगे, मोंड विकास संस्था अशा १००टक्के कर्ज पूर्ण फेड केलेल्या ८ विकास संस्थांचा सत्कार सन्मानपत्र शाल श्रीफळ गुलाबपुष्प देऊन करण्यात आला.
: प्रास्तविक मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी जिल्ह्यातील २२६ विकास संस्था पैकी ९१ संस्थांनी १०० टक्के वसुली केले असून त्यातील ८ संस्था देवगड तालुक्यातील असल्याचे नमूद केले.
या निमित्ताने आयोजित केलेल्या चर्चा सत्रात चेअरमन बाळकृष्ण पाळेकर,किरण, टेंबुलकर,नंदू देसाई,निलेश पेडणेकर,महेश बिडये यांनी सहभाग घेतला.
या वेळी माजी संचालक माजी आमदार अजित गोगटे,बँक संचालक प्रकाश बोडस वसुली बाबत व १०१ कारवाई बाबत आवश्यक ते मार्गदर्शन केले .

You cannot copy content of this page