सावंतवाडीत मटका घेताना एकावर कारवाई

दोन हजारांचा मुद्देमाल जप्त : संजू परब यांच्या इशाऱ्याची घेतली दखल

⚡सावंतवाडी ता.१०-: शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यान विरोधात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आवाज उठवल्यावर आज गुन्हा अन्वेषण विभागाकडून बाहेरचावाडा येथील एकावर धडक मटका घेतल्या प्रकरणी कारवाई केली असून, त्याच्याकडून २ हजार ३० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page