⚡मालवण ता.१०-: मालवण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर मित्रमंडळाच्यावतीने आणि भवानी मित्रमंडळ गवंडीवाडा यांच्या सहकार्याने मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत या वेळेत भवानी मंदिर गवंडीवाडा येथे महिलांसाठी तसेच पंधरा वर्षाखालील मुलांसाठी फनी गेम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक पैठणी बरोबरच बक्षिसे देण्यात येणार असून छोट्या मुलांसाठी फनी गेम्स चे आयोजन करण्यात आले असून मुलांना देखील विविध प्रकारची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत महिला आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच अधिक माहिती आणि नावनोंदणी साठी ९९७५५५७१२३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
