Headlines

आनंद आश्रयला केसरकरांकडून आर्थिक मदत व अन्नदान…

⚡सावंतवाडी ता. ९-: महालय महिन्याचे औचित्य साधून पणदूर येथील आनंद आश्रय येथे माजी आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वतीने आर्थिक मदत व अन्नदान करण्यात आले. तसेच सावंतवाडी शहर महिला शिवसेनेच्या वतीने आश्रयातील नागरिकांना जीवनावश्यक साहित्य आणि आर्थिक स्वरूपात मदत देण्यात आली.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबू कुडतरकर, भारती मोरे, नगरसेविका शर्वरी धारगळकर, सीमा नाईक, दीपाली सावंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
यामध्ये सायली होडावडेकर, पूजा नाईक, हर्षा जाधव, राजश्री निर्गुण, प्रतिमा नाटेकर, आरती खोरागडे, अनघा सावंत, सुवर्णा गाड, सिद्धी निंबाळकर, धनश्री सावंत, मिलाग्रीन डॅन्टस, साधना मोरे, अर्चना बोंद्रे, प्रतीक्षा मिशाळ, शीतल नाईक, साजिदा रेडकर, हेमांगी माने, शुभांगी तुयेकर, अरुणा नाईक, मनीषा परब, सीमा घारे आदी उपस्थित होते.महालय महिन्यात सामाजिक बांधिलकी जपत आनंद आश्रयातील नागरिकांना मदतीचा हात देण्यात आल्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

You cannot copy content of this page