Headlines

पाट हायस्कुल वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम

वनविभागामार्फत दशावतार लोककलेतून जनजागृती

कुडाळ : पाट हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, कासव संवर्धन, कांदळवन संवर्धन, निबंध स्पर्धा त्याचप्रमाणे वनविभागातर्फे खास कोकणातील लोककला प्रकार दशावतार याचा सुंदर उपयोग जनजागृतीसाठी केला.
वन्य जीवांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकांनी सामूहिक जबाबदारी म्हणून ती स्वीकारली पाहिजे, हाच संदेश या नाट्यातून जनमानसात प्रभावीपणे पोचविण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे वन विभागामार्फत प्रमाणपत्र आणि चषक देऊन कौतुक करण्यात आले. वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक सयाजी बोंदर यांनी माहिती दिली. तर हरित सेना प्रमुख संदीप साळसकर यांनी या आधुनिक युगात अन्य साखळीचे महत्त्व कशासाठी आवश्यक आहे ते समजावून सांगितले. यावेळी पर्यवेक्षिका सौ अंकिता मोडक, जि प सदस्या यज्ञा साळगावकर आणि इतर सर्व शिक्षक उपस्थित होते
त्याचप्रमाणे आयोजन प्रमुख वनविभागाचे चेतन पाटील, वनक्षेत्रपाल कुडाळ सूर्यकांत सावंत, वनपाल नेरूर त हवेली.समीर खरवत, वनरक्षक नेरुर तर्फ हवेली प्रसाद पाटील, वनरक्षक आकेरी यशवंत कदम, मंदार गावडे व जलद बचाव कृती पथकाचे सदस्य उपस्थित होते. प्रबोधना बरोबर दशावतार नाटय कलेचा आस्वादही मुलांनी घेतला. वनविभागा मार्फत लोककलेचाही कल्पकतेने वापर केला याचे कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page