गिर्येत मच्छिमार मेळावा संपन्न

बांदेवाडी मच्छिमार सोसायटीचे आयोजन

⚡देवगड ता.१०-: गिर्ये बांदेवाडी मच्छीमार सोसायटीच्या वतीने,नुकताच मच्छीमार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मच्छीमार बांधवांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती सांगण्यासाठी फिशरिजचे अधिकारी श्री महाकाल , तसेच मच्छीमार अपघात विमा योजनेची माहिती देण्यासाठी देवगड पोस्ट ऑफिस चे अधिकारी श्री धुरी. सोबत बांदेवाडी मच्छीमार सोसायटी सर्व संचालक मंडळाचे सदस्य, रामेश्वर सरपंच, गिर्ये पोस्ट ऑफिस मास्तर, आणि उपस्थित मच्छीमार सदस्य, बांधव.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलित करून, अधिकारी यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. उपस्थित मच्छीमार बांधवांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती फिशरीज चे अधिकारी श्री महाकाल अतिशय उत्तम समजावून सांगत उपस्थिती तांचें शंका निरसन केले. लगेचच मच्छीमार बांधवांना अपघाती विम्याचे महत्त्व पटवून देऊन उपस्थित मच्छीमार सदस्यांचा विमा काढण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात, मच्छीमारांनी पारंपरिक मच्छीमारी बरोबर शासकीय योजनेचा लाभ घेत, आधुनिक तेचि कास पकडत आर्थिक सक्षम व्हावं. यासाठी संस्था प्रत्येक सदस्याला मदत करेल. बांदेवाडी मच्छीमार संस्था ही प्रत्येक सभासदांची असून, संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी पुढे येण्याचं आवाहन अध्यक्ष संदीप डोळकर यांनी केले.फोटो-१मेळाव्याचे उदघाटन करताना मान्यवर२)मार्गदर्शन करताना फिशरीज अधिकारी

You cannot copy content of this page