Headlines

भोसले सैनिक स्कूलची आस्था पवार मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल….

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील कॅडेट आस्था पवार हिने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे.

मल्लखांब या कौशल्य, ताकद, संतुलन आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या क्रीडा प्रकारात आस्थाने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. तिच्या या कामगिरीमुळे तिने जिल्हास्तरावर अव्वल स्थान मिळविले.

आस्थाच्या या उल्लेखनीय यशामुळे यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिच्या कामगिरीबद्दल शाळेचे संचालक मंडळ, कमांडंट ले.कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा आणि प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस यांनी आस्थाचे अभिनंदन केले असून, विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page