⚡वैभववाडी ता.०९-: सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंवर्धनाची एक प्रभावी चळवळ उभी राहिली आहे. वैभववाडी तालुक्यातील नावळे गाव येथे ग्रामपंचायत नावळे कृषी महाविद्यालय सांगुळवाडी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी विद्या मंदिर नावळे धनगरवाडा, व गावातील कर्मचारी त्यांच्या सहभागातून नावळे गावात विसहु अधिक नवराई बंधार एका दिवसात बांधून गावचे उद्दिष्ट 30 बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले.
नावळे ग्रामपंचायतच्या वतीने नावळे गावात पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राबवत कृषी महाविद्यालय सांगुळवाडी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी व विद्या मंदिर नावळे धनगरवाडा आणि नावळे गावात असणाऱ्या सर्व कर्मचारी आरोग्य कर्मचारी शिक्षक वर्ग ग्रामसेवक तलाठी व बचत गट यांच्यावतीने शुक्रवारी सकाळपासून वीसहु अधिक वनराई बंधारे बांधण्यात आली. हे बंधारे गावठाणवाडी धनगरवाडा राणेवाडी या तिन्ही वाड्यातील मुख्य नदीवर व वहाळांवर बांधण्यात आले.
यावेळी सरपंच सोनल गुरव उपसरपंच संजय रावराणे ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके रश्मी गुरव पल्लवी गुरव तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव मुख्याध्यापक जयकुमार माने मुजावर मॅडम ज्ञानेश्वर महाले, बचत गट सीआरपी शर्वरी रावराणे माजी सरपंच सुवर्णा गुरव, ग्रामविकास अधिकारी संभाजी वाघमोडे कृषी सहाय्यक बालाजी वाघमोडे पंचायत समिती अधिकारी योगेश गुरव, निरीक्षक ठाकूर कृषी महाविद्यालय सांगुळवाडी प्राध्यापक साबळे सर आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ विजय पैठणी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्नाली गुरव, आरोग्य समुदाय अधिकारी ज्योत्स्ना पाटील अशा सेविका साक्षी शेळके आरोग्य सेवक प्रमोद पडवळ अंगणवाडी सेविका माधवी नरम सुनिता इंदप, नीलम रावराणे, आदी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक प्राध्यापक गावातील सर्व कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या श्रमदान मोहिमेत शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांपासून ते थेट शासकीय अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रत्यक्षात सहभागी होत गावात एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी नावळे ग्रामपंचायतच्या वतीने या आश्रमणात भाग घेणाऱ्या कृषी महाविद्यालय सांगुळवाडी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी सर्व कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

