Headlines

शवविच्छेदनासाठी बांदा आरोग्य केंद्रात सफाईगाराची नियुक्ती…

⚡बांदा ता.०९-: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांत कार्यरत असलेल्या दिनेश शेर्लेकर या सफाईगार कर्मचाऱ्याला श्वविच्छेदन कामासाठी नियुक्ती करण्याचे लेखी आदेश तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत. या प्रश्नासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
आरोग्य केंद्रात श्वविच्छेदनसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अडचणी निर्माण होत होत्या. शवविच्छेदनासाठी आवश्यक असलेले सफाईगाराचे पद रिक्त होते. त्यामुळे संबंधित कामासाठी कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून देण्याची मागणी करण्यात येत होती.
या पार्श्वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र काढून बांदा व आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील सफाईगार कर्मचाऱ्यांना शवविच्छेदन प्रक्रियेसाठी नियुक्ती दिली आहे. आंबोली येथील श्री. कांबळे व बांदा येथील श्री. शेर्लेकर यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
शवविच्छेदनासारख्या संवेदनशील प्रक्रियेसाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मनसे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागाने ही कार्यवाही केल्याने या समस्येवर तात्पुरता मार्ग निघाला आहे.

You cannot copy content of this page