⚡मालवण ता.०९-:
क्रीडा व युवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदूर्ग, व मालवण क्रीडा समिती ,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौके येथील भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय येथे झालेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या गटात श्री रेकोबा हायस्कुल वायरी भूतनाथच्या संघाने विजेतेपद मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली या सामन्यात जीत लुडबे , केदार मसुरकर , चैतन्य आळवे यांनी चमकदार कामगिरी करून विजेतेपद पटकावून दिले.
या स्पर्धेसाठी त्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्रीनाथ फणसेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक श्री संजय खोचरे, पालक शिक्षक संघ पदाधिकारी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग ,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे

