Headlines

भरत लाखे यांना जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील रजिस्टर गहाळ प्रकरणातील संशयित आरोपी भरत लाखे यांना न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोडामार्ग येथील न्यायदंडाधिकारी एस. ए. कुलकर्णी यांनी हा निर्णय दिला.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे आरोपीची चौकशी करण्यासाठी तसेच गहाळ रजिस्टर जप्त करण्यासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, आरोपीच्या वतीने बाजू मांडताना, भारत लाखे यांनी रजिस्टर गहाळ केलेले नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी केवळ रेनकोट आणि हत्यारांची पिशवी घेऊन जाताना दिसत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले असून त्यांनी तपासकामात संपूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी बचाव पक्षाच्या वकिलांनी केली.
सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भारत लाखे यांचा जामीन अर्ज मंजूर केला.
या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲड. संग्राम देसाई, ॲड. चैतन्य सावंत, ॲड. सौरव देसाई, ॲड. राहुल पै, ॲड. ऐश्वर्या पिंगुळकर आणि ॲड. राहुल जाधव यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page