मळगाव येथील रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास सुरूवात

जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

⚡सावंतवाडी ता.११सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरातील जागर उत्सवास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. या जागर उत्सव कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ मंदिरात दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीत जागर उत्सव होत असतो. महिनाभर सुरू असलेल्या या जागर कालावधीत दर दिवशी मंदिरात पुराणवाचन व मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा काढली जाते.
पालखीनंतर उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप करण्यात येते. तसेच पालखी नंतर स्थानिक व आमंत्रित भजन मंडळे आपली भजने सादर करतात. त्रिपुरारी पौर्णिमेला रवळनाथ देवाच्या वार्षिक जत्रोत्सवाने या जागराची सांगता केली जाते. यंदा रवळनाथ देवाचा जत्रोत्सव ७ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या जत्रोत्सवानंतर गावातील जत्रोत्सवास प्रारंभ होतो.

You cannot copy content of this page