Headlines

अपघात प्रकरणातील आरोपीला सशर्त जामीन मंजूर…

⚡सावंतवाडी ता.०९-: मळेवाड-हेदुलवाडी येथे रिक्षा व बोलेरो मॅक्स टेम्पो यांच्यात झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपी प्रशांत गणपत लाड याला ओरोस येथील मे. तदर्थ जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. केतन नारायण जाधव यांनी काम पाहिले.

दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी मळेवाड-हेदुलवाडी येथील बँक ऑफ इंडिया शाखेसमोरील रस्त्यावर रिक्षा क्रमांक MH-07-S-6893 आणि बोलेरो मॅक्स टेम्पो क्रमांक MH-07-AJ-6194 यांच्यात अपघात झाला होता. या अपघातात रिक्षाचालक हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी बोलेरो मॅक्स टेम्पोचालक प्रशांत गणपत लाड याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. आरोपीच्या वतीने मांडण्यात आलेले मुद्दे व कायदेशीर बाबी विचारात घेऊन मा. तदर्थ जिल्हा न्यायाधीश, सिंधुदुर्ग यांनी आरोपीला दि.०८/१०/२०२६ रोजी आवश्यक त्या अटी व शर्तींच्या अधीन राहून जामीन मंजूर केला.

You cannot copy content of this page