Headlines

कोल्हापूरच्या डॉ.व्ही. टी. पाटील फाउंडेशनचा संदीप सावंत यांना परिवर्तन दूत पुरस्कार…

⚡कणकवली ता.१८-: कोल्हापूर येथील डॉ.व्ही. टी. पाटील फाउंडेशन यांच्यामार्फत दिला जाणारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कणकवली येथे सामाजिक काम करणारे संदीप श्रीधर सावंत यांना प्रदान करण्यात आला. कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब, कोल्हापूर या ठिकाणी संदीप सावंत यांनारोख रक्कम 5000/- मानपत्र देऊन सन्मानित करण्यात…

Read Full News

बदललेल्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन…

सावंतवाडी, कणकवली व तळेरे येथे मोफत सत्रे ⚡सावंतवाडी ता.१८-: चालू शैक्षणिक वर्षी पदवी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप बदललेले असून त्याची माहिती विद्यार्थी व पालकांना व्हावी यासाठी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्यावतीने सावंतवाडी, कणकवली व तळेरे या ठिकाणी मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बदललेल्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसोबतच विविध शाखांची ओळख, शिष्यवृत्ती योजना तसेच…

Read Full News

नेमबाज स्पर्धेत आजगांवकर पितापुत्रांचे यश…!

⚡वेंगुर्ला ता.१८-: महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे ५ ते ९ जून या कालवधीत २८वी कॅप्टन एस.जे.इझेकियल स्मृती महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिक्यपद स्पर्धा घेण्यात आली. यात वेंगुर्ला येथील दत्तप्रसाद निळकंठ आजगांवकर आणि कु. गौरव दत्तप्रसाद आजगांवकर या पितापुत्रांनी उज्ज्वल यश संपादन केले. या दोघांची प्रि नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, कोल्हापूर, सातारा,…

Read Full News

भारती महाराज यांच्या हस्ते गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या कला दालनाचे मोठ्या थाटात उदघाटन…!

विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्गातील संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्था “गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या” कला दालनाचे गुरुवार (१२ जून) रोजी तळवणे येथील भारती महाराज मठाचे मठाधीश श्री राजेंद्र स्वामी भारती महाराज यांच्या हस्ते न्हावेली येथे मोठ्या थाटात उदघाटन पार पडले. या मंगल प्रसंगी दिवसभर धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.सकाळी…

Read Full News

नांदरुख-आंबडोस जि. प. शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा…

ग्रामस्थ व पालकांची मागणी.. ⚡मालवण ता.१८-:मालवण तालुक्यातील जि. प. नांदरुख-आंबडोस शाळेला गेल्या काही वर्षांपासून पूर्ण वेळ शिक्षक न मिळाल्यामुळे या शाळेची पटसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे बदली किंवा भरती प्रक्रियेत उपशिक्षक १ व पदवीधर १ अशी रिक्त पदे दाखवावीत, कायमस्वरूपी उपशिक्षक व पदवीधर शिक्षकांची नियुक्ती शाळेवर करावी, अशी मागणी नांदरुख येथील ग्रामस्थ व पालक वर्गाने…

Read Full News

सालईवाडा येथील प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद पडते यांची राहत्या घरी आत्महत्या…!

⚡सावंतवाडी ता.१९-: सालईवाडा येथील प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद पडते यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घरातून बाहेर रक्त येताना दिसल्याने येथील नागरिकांना संशय आला. पोलिसांच्या समक्ष आज त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला. यावेळी गळफास लावत त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तीन-चार दिवसांपूर्वी त्यांनी गळफास घेतल्याचा संशय आहे‌. मयत श्री. पडते यांनी गळफास घेत…

Read Full News

सावंतवाडीत कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न…

भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.१८-:कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या सावंतवाडी येथील नवीन शाखेचे भव्य उद्घाटन आज रत्नेश प्लाझा, साळईवाडा येथे संपन्न झाले. या उद्घाटनप्रसंगी रेक्टर मिलाग्रीस कॅथेड्रल रेव्ह. फा. मिलेट डिसोजा, श्रीमती अॅमी डॉक्टर, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक सुजय कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे…

Read Full News

वैदिक गणित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत कणकवली सेंटरचा डंका…!

कणकवली : कोल्हापूर येथे झालेल्या वैदिक गणित स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यातून एकूण १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली वैदिक गणित सेंटर कणकवली ची १९ विद्यार्थी या परीक्षेत समाविष्ट झाले होते. या परीक्षेत वेदांत गुरव पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. कृष्णा बंडागळे व परिणीती ठाकूर द्वितीय क्रमांकचे मानकरी तर वेदांत करुले…

Read Full News

१ हजार वर्षांनी जिल्ह्यात सोमनाथ ज्योतिर्लिंगांच आगामन…

माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा :शेकडो शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी.. सावंतवाडी : १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग” रुद्रपुजा माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली‌. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा संपन्न झाली. यावेळी शेकडो शिवभक्तांनी केसरकर यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गर्दी केली…

Read Full News

सावंतवाडीत १९ जूनला भाजपा बुद्धिजीवी व व्यावसायिक संमेलन…!

सावंतवाडी (प्रतिनिधी):मोदी सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांचा अमृत काळ — सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा उत्सव साजरा करत भारतीय जनता पार्टीतर्फे बुद्धिजीवी आणि व्यावसायिक लोकांचे भव्य संमेलन गुरुवार, दि. १९ जून २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता सावंतवाडी राजवाडा हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे. या विशेष संमेलनाला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. आमदार रवींद्रजी चव्हाण आणि…

Read Full News

You cannot copy content of this page