Headlines

कुंभारमाठ येथील जरीमरी मंदिरात १७ रोजी डबलबारी सामना

मालवण : (प्रतिनिधी)

नवरात्रोत्सवानिमित्त कुंभारमाठ येथील जरीमरी मंदिरात १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता २०-२० डबलबारी भजनाचा सामना आयोजित करण्यात आला आहे. महेश गावकर आणि मित्रमंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री भैराई देवी महिला भजन मंडळ, मोंड गावठणवाडीच्या बुवा सौ. स्वराली नाटेकर (पखवाज-हर्षद मेस्त्री, तबला-दियोग भाटकर) व देव केसरकर हनुमान महिला भजन मंडळ, वर्दे कुडाळच्या बुवा सौ. योगिता पवार (पखवाज-राजू सावंत, चकवा-काव्या पवार) यांच्यात हा सामना रंगणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक महेश गावकर व मित्रमंडळाने केले आहे.

You cannot copy content of this page