Headlines

आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून श्रमदानातून बंधारा पूर्ण…

मालवण, दि प्रतिनिधी

आगामी काळात दुष्काळ व संभाव्य पाणीटंचाईची तीव्र समस्या भेडसावू नये, यासाठी आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या वतीने पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रमदानातून बंधारा बांधण्यात आला. या स्तुत्य उपक्रमामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून गावातील पाणीप्रश्न सुटण्यास मोठा दिलासा मिळणार आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध पावले उचलत या बंधाऱ्याची उभारणी केली. या उपक्रमात लोकसहभाग आणि श्रमदानाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले.

या श्रमदान व बंधारा उभारणी प्रसंगी सरपंच रश्मी टेंबुलकर, ग्रामपंचायत अधिकारी आत्माराम जोशी, केंद्रचालक प्रिशा बांदल, कर्मचारी विजय चव्हाण, माजी सरपंच रविंद्र टेंबुलकर यांच्यासह ग्रामस्थ चंद्रकांत घाटगे, मोहन घाटगे, मनोहर घाटगे, विजय सुकाळी, शरद घाटगे व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page