Headlines

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई व जलताराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.०७-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई बंधारा व जलतारा खड्डा खोदून शुभारंभ करण्यात आला.
पाऊस कमी पडल्याने पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी वनराई बंधारे व जलतारा खड्डे मारण्यासाठी शासन स्तरावरून अभियान सुरू करण्यात आली असून गावागावात या अभियानांतर्गत चांगला प्रतिसाद मिळत असून याच अनुषंगाने
ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून वनराई बंधारा व जलतारा खड्डा खोदून शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासक शिवाजी गावित ग्रामपंचायत अधिकारी भालचंद्र सावंत, माजी उपसरपंच हेमंत मराठे, रोजगार सेवक अमित नाईक,आशा, अंगणवाडी सेविका, सी आर पी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी माजी उपसरपंच यांनी वनराई बंधारे व जलतारा खड्डा कामाचा लोकसहभागातून शुभारंभ करण्यात आला असून गावात 10 ते 12 बंधारे व 100 जलतारा खड्डे खोदाई करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला.

You cannot copy content of this page