सावंतवाडीत १९ जूनला भाजपा बुद्धिजीवी व व्यावसायिक संमेलन…!

सावंतवाडी (प्रतिनिधी):
मोदी सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांचा अमृत काळ — सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा उत्सव साजरा करत भारतीय जनता पार्टीतर्फे बुद्धिजीवी आणि व्यावसायिक लोकांचे भव्य संमेलन गुरुवार, दि. १९ जून २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता सावंतवाडी राजवाडा हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.

या विशेष संमेलनाला महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मा. आमदार रवींद्रजी चव्हाण आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मा. श्री प्रभाकरजी सावंत प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला मोर्चा व महिला पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडल कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक, नगरसेविका, माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष तसेच सर्व मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page