⚡मालवण ता.१०-: मालवण येथील मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी प्रणया दत्ताराम चव्हाण हिने फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ७०.२७ टक्के गुण मिळवून जिल्हास्तरावर २० वा क्रमांक प्राप्त करीत यश मिळविले आहे.
प्रणया चव्हाण हिला प्रशालेतील शिक्षक श्री. राणे, श्रीमती फर्नांडिस, सौ. तोडणकर, सौ. सावंत, श्री. पराडकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल प्रणया चव्हाण हिचे मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच मुख्याध्यापिका सौ. तेजल वेंगुर्लेकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन केले आहे.