सावंतवाडी ता.११: सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य व क्रीडा सभापतीपदी नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
श्री आडीवरेकर यांनी यापूर्वीही आरोग्य सभापती म्हणून शहरात उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर आरोग्य व क्रीडा सभापतीपदाची जबाबदारी सोपवली आहे. निवड जाहीर होताच उपस्थितांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर,नगरसेवक बाबू कुडतरकर उपस्थित होते.
