⚡सावंतवाडी ता.११ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सहसंयोजक केतन आजगांवकर यांनी पंडितजींच्या कार्याची महती विषद करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.
यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब, सहसंयोजक केतन आजगांवकर, मळेवाड उपसरपंच हेमंत परब, आजगाव शक्ती केंद्र प्रमुख ओंकार प्रभू, गिरीष परब, बंड्या दळवी, भाजपा राज्य सोशल मीडिया प्रमुख अविनाश पराडकर आदी उपस्थित होते.
