सावंतवाडी नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड…

भाजपाच्या नगरसेवकांना प्रमुख संधी; सदस्यपदी शिंदे शिवसेना, उबाठा व काँग्रेसलाही प्रतिनिधित्व..

⚡सावंतवाडी ता.१३-:
येथील नगरपालिकेच्या विषय समिती सभापती आणि उपसभापती निवड आज शांततेत आणि बिनविरोध पार पडली. यामध्ये समाज कल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण समिती सभापतीपदी पदसिद्ध उपनगराध्यक्ष अनिल निरावडेकर, नियोजन व जलसंधारण व पर्यावरण समिती सभापती मोतीराम नेवगी, आरोग्य व क्रीडा समिती सभापती सुधीर आडीवरेकर, पाणीपुरवठा समिती सभापती प्रतीक बांदेकर, महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उद्यान व पर्यटन समिती सभापती मोहिनी मडगावकर यांची निवड करण्यात आली.
यातील स्थायी समितीचे सभापती हे पदसिद्ध नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले असणार आहेत तर या समितीचे सदस्य हे विषय समितीचे सभापती राहणार आहेत. येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची निवड पार पडल्यानंतर विषय समितीच्या सभापतीपदाची निवड आज मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सहाही विषय समिती सभापतीपदी भाजपाचे नगरसेवकांना संधी देण्यात आली तर सदस्य पदी शिंदे शिवसेनेच्या बाबु कुडतरकर,अजय गोंदावळे, दुर्गेश सूर्याजी, सायली दुभाषी, ॲड.नीता कविटकर तर उबाठाच्या देवेंद्र टेमकर आणि काँग्रेसच्या तौकीर शेख यांना संधी देण्यात आली.
सदरची प्रक्रिया बिनविरोध आणि शांततेत झाली, सकाळी भाजपच्या नगरसेवकांकडून सभापती पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी तीन वाजता सभापती पदाची घोषणा करण्यात आली. यावेळी निवड झालेल्या सर्व सभापतीं व उपसभापतीचे मुख्याधिकारी विनायक औंधकर, उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

समिती सभापती आणि सदस्य असे..
समाज कल्याण व ज्येष्ठ नागरिक कल्याण समिती
​उपनगराध्यक्ष तथा पदसिद्ध सभापती: ॲड. श्री. अनिल कृष्णा निरवडेकर ​सदस्य:वीणा जाधव,
​सुनिता पेडणेकर,स्नेहा नाईक,
​खेमराज उर्फ बाबु कुडतरकर,

नियोजन जलनि:सारण व पर्यावरण समिती ​सभापती: मोतीराम नेवगी,
​सदस्य निलम नाईक, सुकन्या टोपले, खेमराज उर्फ बाबु कुडतरकर,अजय गोंदावळे,

आरोग्य व क्रिडा समिती
​सभापती: सुधीर आडीवरेकर,
​सदस्य निलम नाईक,​सदस्य वीणा जाधव, दुर्गेश सूर्याजी,सायली दुभाषी.

पाणी पुरवठा समिती ​सभापती: सिताराम उर्फ प्रतिक बांदेकर,
​सदस्य दुलारी रांगणेकर,सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर,देवेंद्र टेमकर,

महिला व बाल कल्याण समिती
​सभापती दिपाली भालेकर,
​उपसभापती सुनिता पेडणेकर,
​सदस्य दुलारी रांगणेकर,​शर्वरी धारगळकर,स्नेहा नाईक,

उद्यान व पर्यटन समिती ​सभापती: शर्वरी (मोहिनी) मडगावकर,
​सदस्य सुकन्या टोपले,अजय गोंदावळे, निता सावंत कविटकर,
तौकीर शेख,

​स्थायी समिती
​नगराध्यक्ष तथा पदसिद्ध सभापती: श्रद्धा सावंत भोसले, ​सदस्य ॲड. अनिल निरवडेकर,मोतीराम नेवगी,
​सुधीर आडीवरेकर, सिताराम बांदेकर, दिपाली भालेकर,शर्वरी (मोहिनी) मडगावकर.

You cannot copy content of this page