⚡वेंगुर्ला ता.१०-: भुजनागवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात आज पौर्णिमेचा गोपाळकाला उत्सव अबालवृद्धांच्या सहभागात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या काल्याची सुरूवात भजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित लहान मुलांनी विविध पारंपारीक खेळ खेळत जुन्या खेळांची आठवण करून उत्साहात दहीहंडी फोडली. त्यानंतर कुबलवाडा मारूती मंदिर, साकव ओहोळ, रामेश्वर मंदिर, नरसिह मंदिर, कुळेश्वर मंदिर यांना भेट देत तेथे विठ्ठल भक्तांनी आरती केली. शेवटी भुजनागवाडी विठ्ठल मंदिरात केलेल्या आरतीने उत्सवाची सांगता झाली.
गुरूपौर्णिमेचा गोपाळकाला उत्साहात संपन्न…
