⚡मालवण ता.१०-:
सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ, शाखा मालवण तर्फे विद्यार्थी सत्कार सोहळा आणि वधु-वर सुचक मेळावा रविवार दि. २० जुलै रोजी सकाळी १०. ३० वा. लिलांजली हॉल, भरड मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मालवण तालुक्यातील देवळी समाजातील ज्ञाती इ. ५ वी ८ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी आणि पहिली ते उच्च शिक्षीत पदवी उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर वधू वर सूचक मेळावा होणार आहे. तरी देवळी समाजातील विद्यार्थी, पालक, बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांनी कार्यक्रमांस उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, सचिव विष्णू चौकेकर, खजिनदार मधुसूदन परुळेकर व पदाधिकारी यांनी केले आहे.