संग्राम साळसकर यांची युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती…!

⚡मालवण ता.१७-:
शिवसेना पक्षाच्या युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष (कुडाळ, मालवण) पदी मालवण येथील युवा नेतृत्व संग्राम सुधीर साळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युवासेना सचिव म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडणाऱ्या संग्राम यांच्या कार्याची दखल घेऊन त्याना जिल्हाध्यक्ष पदी बढती देण्यात आली असून पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सचिव किरण साळी यांच्या स्वाक्षरी पत्राने संग्राम सुधीर साळसकर यांची शिवसेना पक्षाच्या युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष (कुडाळ, मालवण)” पदी नियुक्ती करण्यात येत आहे.

नियुक्ती नंतर संग्राम साळसकर यांनी शिवसेना युवासेना सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे आभार व्यक्त करताना आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना युवासेना अधिक बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे सांगितले. आमदार निलेश राणे यांनी मालवण कुडाळ मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे. दहा वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या मतदारसंघाला नवसंजीवनी दिली. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. अपेक्षित असे काम करण्यासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे संग्राम साळसकर यांनी सांगितले आहे.

फोटो : संग्राम साळसकर

You cannot copy content of this page