Headlines

उबाठा शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज माजी आमदार, जिल्हाप्रमुख वैभव नाईक आणि माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शिवसेना शाखा येथे करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी वैभव नाईक यांनी केले.

यावेळी माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे ब्रीद घेऊन शिवसेना कार्यरत आहे. महाराष्ट्र हितासाठी शिवसेनेने अनेक वेळा विरोधात राहून संघर्ष केला आहे. लोकांची छोटी मोठी कामे करण्याचे शिवसेनेचे ध्येय आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना लढा देत असून शिवसेनेने कधीही सत्तेसाठी आणि राजकारणासाठी हिंदुत्वाचा गैरवापर केलेला नाही. सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध तरुण वर्ग रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे. त्या आंदोलनांना शिवसेनाच न्याय देऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील तरुणांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्य नोंदणीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वैभव नाईक यांनी केले.

याप्रसंगी शिवसेना मालवण शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, उपशहर प्रमुख उमेश मांजरेकर, महेश जावकर, महिला तालुका समन्वयक पूजा करलकर, शहर संघटिका राधिका मोंडकर, रूपा कुडाळकर, उमेश चव्हाण, सरपंच अमोल वस्त, सरपंच भगवान लुडबे, मयुर करंगुटकर, गौरी सावंत, पोईप उपविभागप्रमुख समीर लाड, छोटू सावजी, किशोर गावकर, मिनेश मयेकर, सुरेश मडये आदी शिवसैनिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page