कणकवली : कोल्हापूर येथे झालेल्या वैदिक गणित स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यातून एकूण १००० विद्यार्थी सहभागी झाले होते. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली वैदिक गणित सेंटर कणकवली ची १९ विद्यार्थी या परीक्षेत समाविष्ट झाले होते. या परीक्षेत वेदांत गुरव पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. कृष्णा बंडागळे व परिणीती ठाकूर द्वितीय क्रमांकचे मानकरी तर वेदांत करुले तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. पार्थ तेली ( चतुर्थ क्रमांक ), ऋता जोशी ( पाचवा क्रमांक ) तेजस सावंत ( सहावा क्रमांक ) मिळवला आहे. या सातही विद्यार्थ्यांना winner ट्रॉफी देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. कु. सारा गोखले, कु. अनन्या पडते, कु. कार्तिक साईल, कु. वेदा महाडिक, कु. यशस्वी तेली, कु. प्रांजल तवटे, कु. सेजल पिळणकर, कु. शौर्य तेली, कु. पुष्कर महाडिक, कु. पद्मज महाडिक, कु. अद्विक गायकवाड, कु. भूमी बंडागळे हे विद्यार्थी देखील वैदिक गणित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत सहभागी झाले होते. त्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना वैदिक गणित सेंटर कणकवलीच्या संचालिका डॉ. स्नेहल जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
वैदिक गणित नॅशनल कॉम्पिटिशन परीक्षेत कणकवली सेंटरचा डंका…!
