सावंतवाडीत कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न…

भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा..

⚡सावंतवाडी ता.१८-:
कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या सावंतवाडी येथील नवीन शाखेचे भव्य उद्घाटन आज रत्नेश प्लाझा, साळईवाडा येथे संपन्न झाले. या उद्घाटनप्रसंगी रेक्टर मिलाग्रीस कॅथेड्रल रेव्ह. फा. मिलेट डिसोजा, श्रीमती अॅमी डॉक्टर, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सहाय्यक निबंधक सुजय कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्री. महेश सारंग आणि संस्थांचे युवराज लखन राजे भोसले यांनी उपस्थित राहून पुष्पगुच्छ देत संस्थेच्या नवीन शाखेस शुभेच्छा दिल्या.

त्यावेळी त्यांच्यासोबत शहराध्यक्ष श्री. सुधीर आडीवेकर, अनिल निरवडेकर, संजू शिरोडकर आदी भाजप पदाधिकारीही उपस्थित होते.

या वेळी संस्थेच्या चेअरमन श्रीमती आनामारी डिसोजा, व्हा. चेअरमन श्री. पीटर डिसोजा, सेक्रेटरी श्री. मार्टिन आलेमेडा, तसेच सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने उद्घाटन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. सोहळ्याला मोठ्या संख्येने सभासद, ठेवीदार व हितचिंतकांनी हजेरी लावली होती

You cannot copy content of this page