सावंतवाडी शाळा नंबर चार मध्ये नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या शुभहस्ते अंगणवाडी सेविकांचा सन्मान..

⚡सावंतवाडी ता.०७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत सेवा सप्ताह च्या निमित्ताने एक विशेष कार्यक्रम म्हणून,”अंगण का उत्सव” हा विशेष कार्यक्रम आयोजित केला होता त्यात शाळा नंबर २चा कार्यक्रम 3 ऑक्टोंबर रोजी शाळा नंबर 4 चा कार्यक्रम 6 ऑक्टोंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शाळा नंबर 4 मध्ये अंगणवाडी सेविका सौ सारिका संजय भिसे व मदतनीस अक्षता अनिल
कुडतरकर यांचा साडी व पुष्पगुच्छ देऊन नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच यावेळी मुलांना पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रम संयोजिका महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर उद्यान व पर्यटन सभापती शर्वरी मडगावकर उपसभापती सुनिता पेडणेकर नगरसेविका नीलम नाईक मेघना साळगावकर मिसबा शेख साक्षी गवस केंद्रप्रमुख ठाकूर सर मुख्याध्यापक पालव सर संतोष तळवणेकर शमिका नेमळेकर रूपाली रेमूळकर माता पालक भगिनी आदी उपस्थित होते
या अंगण म्हणजे केवळ घरासमोरील जागा नाही तर आपल्या बालपणाच्या आठवणी खेळ संस्कार आणि आनंद याचे सुंदर ठिकाण आहे.
अंगण महोत्सव च्या माध्यमातून आपली संस्कृती परंपरा कला आणि लोकजीवन याची ओळख आपल्याला होते विविध खेळ नृत्य गाणी हस्तकला आणि पारंपारिक उपक्रमांमधून आपल्या संस्कृती जपण्याचा सुंदर संदेश या महोत्सवातून मिळतो अशा महोत्सवामुळे आपल्यांमध्ये एकोपा सहकार्य सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढतो मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपल्या पारंपरिक खेळांना आणि संस्कृतीला विसरू नये हीच या महोत्सवाची खरी शिकवण आहे म्हणूनच आपल्या छोट्या मुलांवर उत्तम संस्कार व त्यांच्या बालमनावरील जडणघडणीचा पाया या अंगणवाडी सेविका करत असतात म्हणूनच अशा सेविकांचा सन्मान करणे व त्यांचे मनोबल वाढवणे हा उद्देश समोर ठेवून अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले मॅडम यांचे विशेष असे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संयोजिका दिपाली भालेकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली नंतर नगराध्यक्ष भोसले मॅडम यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते अशाप्रकारे “आंगण का उत्सव” हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
