कोल्हापूरच्या डॉ.व्ही. टी. पाटील फाउंडेशनचा संदीप सावंत यांना परिवर्तन दूत पुरस्कार…

⚡कणकवली ता.१८-: कोल्हापूर येथील डॉ.व्ही. टी. पाटील फाउंडेशन यांच्यामार्फत दिला जाणारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कणकवली येथे सामाजिक काम करणारे संदीप श्रीधर सावंत यांना प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब, कोल्हापूर या ठिकाणी संदीप सावंत यांना
रोख रक्कम 5000/- मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संदीप सावंत हे स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात युवक युवती व महिलांकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम करत आहेत.महिलांजवळ असलेल्या कौशल्याचा वापर करून त्यांना त्यामध्ये आधुनिकतेची जोड देऊन रोजगार निर्मिती कशी करू शकतो याचे प्रशिक्षण देऊन स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक उद्योजिका त्यांनी तयार केल्या आहेत.
स्वयंसहाय्यता बचत गट महिला व युवक युवतीकरिता खाद्यपदार्थ, हस्तकला, चित्रकला, टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे यासारख्या अनेक प्रशिक्षणाचे आयोजन करून रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या.सध्या लोप पावत चाललेली व महाराष्ट्राची शान असलेली गोधडी उद्योग सुरू करून अनेक महिला आपल्या फावल्या वेळेचा उपयोग करून हाताने गोधडी शिवून आपला उदर निर्वाह करत आहे
स्वयंदीपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम स्वयंदीप ट्रस्ट आज करत आहेभविष्यात स्वयंदीपच्या माध्यमातून 500 हून अधिक महिला स्वतःचा रोजगार उभा करतील असा मानस संदीप सावंत यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page