भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात ख्रिस्ती समाजाची कारवाईची मागणी…
सावंतवाडी : आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती समाजाबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॅथोलिक समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या विधानांबद्दल पडळकरांवर कायदेशीर कारवाई करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोमन कॅथोलिक समाज अनेक शतकांपासून इतर समाजांसोबत सलोख्याने आणि…
