‘कीर्तन पंचक’, भजनबारी सामना, पौराणिक दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

मालवण, दि प्रतिनिधी
श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भरड-मालवण यांच्या वतीने ७ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम भरड-मालवण येथील श्री दत्त मंदिर प्रांगणात पार पडणार आहेत.
७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता अभिवाचन अनुभव ‘उत्तरचंद्राची कोजागिरी’. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्री भावई प्रासादिक भजन मंडळ, कोचरा यांचा वारकरी भजनाचा कार्यक्रम. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य भजनबारी सामना – श्री देवी भगवती प्रसादिक भजन मंडळ बांव, कुडाळ (बुवा – लक्ष्मण नेवाळकर) विरुद्ध विश्वकर्मा भजन मंडळ, देऊळवाडी आचरा मालवण (बुवा – संदेश प्रदिप मेस्त्री). १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग. १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता अष्टपैलु कलानिकेतन, मालवण प्रस्तुत ‘सुगम संगीत’. २१ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर कीर्तन पंचक २०२६’ होईल. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. विश्वास कुलकर्णी (पुणे) – विषय महामुनी श्री अष्टावक्र. २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता ह.भ.प. हर्षद जोगळेकर (पुणे) – विषय विठ्ठलभक्त जळोजी मळोजी. २३ ऑक्टोबर सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. ज्ञानेश धानोरकर जोशी (पुणे) विषय हनुमंत अनन्य भक्ति. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. वर्षा रानडे सहस्रबुद्धे (पनवेल) विषय संत मीराबाई. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता ह.भ.प. हरिहर नातू (मालवण) – विषय कौशिकी अवतार शुंभ-निशुंभ वध. २९ ऑक्टोबर रोजी सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वाजता सुश्राव्य भजन, रात्री १० वाजता वालावलकर दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा पौराणिक दशावतार नाट्यप्रयोग. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाआरती महापुरुष भजन मंडळ. सायंकाळी ६ वाजता चलचित्र देखाव्यासहित ढोल ताशांच्या गजरात श्रींची विसर्जन मिरवणूक होईल.
या सर्व भक्तिमय व सांस्कृतिक कार्यक्रमांचा तसेच तीर्थप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भरड-मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
