मालवण दि प्रतिनिधी

मालवण येथील नगर वाचन मंदिरच्या वतीने जिल्हास्तरीय ‘कवी शरद साटम स्मृती काव्य स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या सभागृहात पार पडणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे
७००, ५००, ३०० रुपये व प्रशस्तीपत्रक दिले जाईल. कविता स्वरचित व मराठी असावी.सामाजिक आणि प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येईल. कवितेमध्ये राजकीय विडंबन व अश्लीलता असू नये. कविता दीर्घ नसावी. सादरीकरणाचा कालावधी ३ ते ५ मिनिटे असेल. एका स्पर्धकाला एकच कविता वाचता येईल.परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील.
स्पर्धकांनी आपल्या कविता १० ऑक्टोबर पर्यंत पोहोचतील अशा रीतीने पाठवाव्यात किंवा समक्ष आणून द्याव्यात. पत्ता संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण, जि. सिंधुदुर्ग.
मोबाईल ९४२२२३४९५० स्पर्धकाने कवितेसोबत आपला संपर्क क्रमांक देणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी सहायक ग्रंथपाल सौ. श्रेया चव्हाण मोबा. ८३९०६९४३३१ यांच्याशी संपर्क साधावा.
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.
