Headlines

टोपीवाला प्रशालेच्या संघाचे व्हॉलीबॉलमध्ये विजेतेपद

मालवण : (प्रतिनिधी)

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश स्कूल, आचरा येथे १७ वर्षांखालील मुलींच्या मालवण तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनंत शिवाजी देसाई टोपीवाला प्रशालेच्या मुलींच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

या विजयामुळे टोपीवाला प्रशालेचा संघ आगामी जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजेत्या संघाला शाम वारंग आणि रेनॉल्ड भूतेलो यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या संघातील खेळाडूंचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, पर्यवेक्षक देवीदास वेरलकर, एस. बी. वाकुडे, मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत तसेच ज्येष्ठ सदस्य दिगंबर सामंत यांनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page