Headlines

पिंगुळीत फास लावलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह…

⚡कुडाळ ता.०४-: पिंगुळी मुस्लीमवाडी येथील बरकत अल्लीदाऊद खान ( 38) यांने स्वयंपाक घरातील लोखंडी बारला ओढणीने गळफास घेतला. यात त्याचा मृत्यू झाला. याबाबतची खबर बिलाल रहीमतुल्ला शेख रा पिंगुळी मुस्लीमवाडा याने कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. सोमवारी सकाळी सात वाजता बरकत खानचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत घरात आढळून आला. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Read Full News

राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत आयडियलच्या विद्यार्थ्यांचे यश…!

⚡कणकवली ता.०४-: यू. आय. एस. मीडिया यांच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे प्रशालाचा विद्यार्थी आयुष अवधीत बागवे (९वी) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे तर याच स्पर्धेत प्रशालेचा तनय सिद्धेश नातू (९ वी) याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे….

Read Full News

एक राखी लाडक्या देवाभाऊसाठी अभियान…

जिल्हा भाजप एक लाख राख्या पाठविणार:लाडक्या बहिणींनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन,प्रभाकर सावंत.. ⚡ओरोस ता ४-: महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणी लाडका भाऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या रक्षाबंधन औचित्यावर महाराष्ट्र प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बुथवरून १०० याप्रमाणे एकूण १ कोटी राख्या आणि त्यांच्यासाठी शुभसंदेश पाठविण्याचे एक विशेष अभियान नियोजित केलेले आहे….

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडीत बसविण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण…

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन डायलेसिस मशीनचे लोकार्पण आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले तर रुग्णांच्या सोयीसाठी सावंतवाडी नंतर दोडामार्ग आणि वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात लवकरच प्रत्येकी दोन डायलिसिस मशीन बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. या लोकार्पण सोहळ्या दरम्यान दिली सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बसविण्यात आलेल्या मशीनचे लोकार्पण आज श्री. केसरकर…

Read Full News

शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारी आणि रेडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू…

दीपक केसरकर:महायुतीची राजकीय परिस्थिती चांगली, त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे वादग्रस्त विधान करू नये.. ⚡सावंतवाडी ता.०४-: शक्तीपीठ महामार्ग आता मळगावसह तिलारी आणि रेडीपर्यंत विभागून नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेर आदेश दिले असून, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळेलअसा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी आज इथं व्यक्त केला. दोडामार्ग तालुक्यात…

Read Full News

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी युवानेते संदिप गावडे यांची नियुक्ती…!

⚡सावंतवाडी ता.०४-: भारतीय जनता पार्टी तर्फे दि ०४ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी युवानेते संदिप गावडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे आजरोजी जाहीर केले. या अभियानंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येणार…

Read Full News

उबाठाच्या वतीने १३ ऑगस्टला महामार्गावर चक्का जाम आंदोलन…

पत्रकार परिषदेत उबाठा पदाधिकाऱ्यांची माहिती:गेल्या अकरा वर्षात महामार्गाची दुरवस्था.. कुडाळ : सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना रवींद्र चव्हाण यांनी गेल्या गणेश चतुर्थीपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असे सांगितले होते. पण रस्ता पूर्ण होणे सोडाच अस्तित्वात असलेल्या मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अकरा वर्षातच रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी…

Read Full News

मुंबई – गोवा महामार्गावर अपघात…

आईचा मृत्यू ; वडील, मुलगा, मुलगी बचावली.. ओरोस : मुंबई – गोवा महामार्गावर खालसा धाब्यासमोर मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक दिल्याने ओरोस वर्देरोड येथील मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार ( वय २७ ) या जागीच मृत झाल्या आहेत. तर मोपेड चालक शशांक प्रकाश पवार ( वय. ४० ) व त्यांचे चार महिन्याचे बाळ पवित्रा…

Read Full News

बोलेरो पिकपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील छोटी मुलगी जखमी…!

⚡बांदा ता.०४-: बांदा उड्डाणंपूलाखाली बोलेरो पिकपने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील छोट्या मुलीला दुखापत झाली. जखमीना रुग्णवाहिकेतून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली असून बांदा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त बोलेरो चौकातून हायवेवर येत होती तर दुचाकी हायवेवरून जात होती. बोलेरोची धडक बसल्याने दुचाकी चालक त्याची पत्नी व…

Read Full News

केसरकरांच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे, वजन कमी झाल्याने मतदार संघात अधिकारी नाहीत…

रुपेश राऊळ: यांची टीका: अधिकारी नसल्याने लोकांनी न्याय मागायचा कोणाकडे..? ⚡सावंतवाडी ता.०४-: मतदार संघात अनेक प्रश्न गंभीर आहेत.मतदार संघात अधिकारीच नाहीत, असे असताना केसरकर गप्प का..? की त्यांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे वजन कमी झाले की काय असा संशय रुपेश राऊळ यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान आम्ही विरोधक म्हणून सातत्याने विविध प्रश्नांवर आवाज उठवत आहे. परंतु…

Read Full News

You cannot copy content of this page